डॉ नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मरणार्थ विवेकी विचाराचा प्रसार-प्रचार म्हणून लोकजागर उपक्रम सुरु (जाने-२०१७) अभियान, जाग, वुई नीड यू सोसायटी, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, जिज्ञासा, भारतीय महिला फेडरेशन, स्वराज अभियान, चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समिती या संघटनांनी महिन्याच्या वीस तारखेला अनेक कार्यक्रम आयोजित केले

लोकजागर उपक्रमात व्याख्याने (डॉ विश्वंभर चौधरी, मुक्ता दाभोलकर, स्वराज अभियान जाने-१७, हवामानबदल, शिरीष मेढी सप्टें-१९) झाली, प्रदर्शन (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागेश हाटकर यांची चित्रे, जाने-१८) आयोजित केले गेले, मुलाखती (डॉ मंदाकिनी-डॉ प्रकाश आमटे, जाने-१८, उल्का महाजन-डॉ गिरीश कुलकर्णी-डॉ आनंद नाडकर्णी, वुई नीड यु, मे-१८) घेतल्या गेल्या, परीसंवाद (विश्वंभर चौधरी, मुक्ता दाभोलकर), लघुपट (हिरोशिमा, जाग, ऑग-१७), रिंगण-नाट्य किंवा कलापथकाचे कार्यक्रम झाले, शाळकरी विद्यार्थ्यांची स्पर्धा (पर्यावरण-पूरक गणेशोत्सव, जिज्ञासा ऑग-१७) झाली, नाटिका-पथ-नाट्य (“आम्हाला जगू द्या”, भारतीय महिला फेडरेशन मे-१७, या गांधींच करायचं काय ? फेब्रु-१९) सादर केली गेली, पुस्तकांवर चर्चा (पाऊल वाजे, टेक्नोलॉजी, तरूण पिढी व साहित्य या विषयावर लेखक विवेक गोविलकर व अन्य मान्यवर यांची चर्चा – वुई नीड यु जुलै-१८, मॉब-लींचिंग विषयावरील “प्रेमाची वारी” पुस्तकाचे अभिवाचन, प्रमोद मुजुमदार) झाल्या, विवेकवादी विचारांचे कीर्तन झाले, डॉ नरेंद्र दाभोलकर प्रभातफेरी पण निघाली, अगदी ठाण्याच्या पालिका अर्थ-संकल्पाची चिरफाड देखील करण्यात आली (सुलक्षणा महाजन, रवींद्र पोखरकर व श्याम सोनार, स्वराज अभियान एप्रि-१८), कॉलेज विद्यार्थ्यांची काव्यस्पर्धा (जाने-१८) व कवी करंदीकरांच्या स्फोटक कवितांवर खास कार्यक्रम विन्दायन (जून-१८) झाला, अशा सांस्कृतिक-सामाजिक प्रश्नांवर कार्यक्रम होत असतानाच खाडीच्या पाण्याचे विक्षारीकरण करणाऱ्या पालिकेच्या महागड्या प्रकल्पाची चिकित्सा करून त्याला विरोध करण्याचे आंदोलन पण उभे राहिले किंवा आधार कार्ड संभाव्य दुरुपयोग दाखविणारा आधार नही-अधिकार चाहिए (Break Adhar Chains) कार्यक्रम झाला (जून-१८) आणि आरे जंगल वाचविणाऱ्या यशस्वी आंदोलकांचा सत्कार संभाजी भगत यांच्या हस्ते (डिसें-१९) करण्यात आला