१६ मार्च २०१७ – अशास्त्रीय पद्धतीने झाडांच्या फांद्या तोडल्या म्हणून राष्ट्रीय हरित आयोगाने केला ठाणे पालिका आयुक्त श्री संजीव जैस्वाल यांना रु.५०००० दंड आणि झाडांची निगा राखणे, फांद्याची छाटणी करणे, झाडे लावणे-अपवादात्मक परिस्थितीत तोडणे याचे धोरणच महापालीकेकडे नाही, यावर खेद व्यक्त करून आदेश दिला की दोन महिन्याच्या आत तातडीने वृक्ष धोरण बनवा. (प्रकरण १५७/२०१६).

आज साडे-चार महिने होऊन गेले तरी वृक्ष अधिकारी झोपून आहेत, बिल्डरांच्या जागेत अर्ज आला रे आला कि झाडे तोडण्याची कारवाई सुरु करणारे अधिकारी अनेक वेळा प्रोसिजर न करता, परवानगी न देता फांद्याची आणि झाडांची खुलेआम कत्तल करीत होते. नागरिकांच्या जीवाची पर्वा नसलेले हे अधिकारी कालपर्यंत सामान्य माणसांचे अर्ज धुडकावून लावत होते, केराच्या टोपलीत टाकत होते.

आपल्याकडून वृक्ष-कर घेतला जातो, ८२ कोटींचे बजेट त्यासाठी आहे. झाडांच्या बुंध्याशी एक मीटरचे खळ करण्याऐवजी रस्ते-रुंद करण्यात खुश होणारे अधिकारी झाडांच्या बुंध्याभोवती सिमेंट-कॉंक्रीट टाकून झाडे कमकुवत करत आहेत, पावसाळ्यापूर्वी निट सर्व्हे करून शहरातील झाडांच्या धोकादायक फांद्या तोडल्या जायला हव्यात, पालिकेच्या वृक्ष-प्राधीकरणाची आणि वृक्ष-अधिकाऱ्यांची हि जबाबदारी आहे. हि जबाबदारी पार न पडल्याने झाडे पडतात आणि जीवित-हानी होते. (राष्ट्रीय हरित आयोग – प्रकरण ८२/२०१३)

“ठाणे मतदाता जागरण अभियान”ची स्पष्ट भूमिका : वृक्ष-धोरण बनवा, झाडे वाचवा, माणसे वाचवा ठाणे पालिकेच्या व वृक्ष-अधिकारी केदार पाटील यांच्या हलगर्जीपणामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. वरील सत्य परिस्थिती पाहता अॅड. किशोर पवार यांच्या अपघाताला व मृत्यूला ठाणे पालिकेचे वृक्ष-अधिकारी जबाबदार आहे. म्हणून श्री केदार पाटील यांच्यावर सदोष मनुष्य-वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही करीत आहोत. झाड पडते ते वृक्ष-प्राधिकरणाच्या आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे सोसायटी/महापालिका आयुक्त/वृक्ष अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *