या पावसाळ्यात मुंबई-ठाण्यात झाडे पडण्याचे प्रमाण “झाडे पडतात की पाडली जातात असा प्रश्न उपस्थित होण्याइतके” जास्त आहे. त्याचवेळी गेल्या ३ वर्षात वेगवेगळ्या कारणांसाठी केवळ मुंबईत 21000 झाडांची कत्तल केली गेली आणि त्यातील पुन:रोपण केलेल्या झाडांची माहिती पालिकेकडे नाही, हे वास्तव धक्कादायक आहे. आणि गेल्या २ महिन्यात ठाण्यात ४५० झाडे पडली आहेत आणि हजारो पाडली गेली आहेत.

नागरीकरणामुळे एका बाजुला कत्तल आणि दुसऱ्या बाजूला वृक्षारोपण, झाडांची निगा राखणे, संवर्धन करणे हा नावापुरता उपचार अशावेळी या सगळ्या गैर प्रकाराला आळा घालू शकतात इतके कायदा व नियम मात्र कडक असतानाही परिस्थिती हाताबाहेर चालली आहे, लोकप्रतिनिधी काही करीत नाहीत व अधिकारी बिल्डरांसाठी आणि पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून विकासासाठी ग्लोबल वॉर्मिगला व विनाशाला हातभार लावत आहेत म्हणून गरज आहे व्यापक जनजागरणाची

म्हणून आयोजित करीत आहोत वृक्ष जागरण परिषद गुरुवार 17 ऑगस्ट संध्या 5 वाजता सरस्वती हायस्कूल, नौपाडा, ठाणे येथे झाडे, झाडांचे महत्त्व, झाडांचं कायदा व नियम, पालिकेची जबाबदारी व कर्तव्ये, झाडे का पडतात, झाडांची निगा, झाडे पाडणे किंवा पडणे याला कसा लगाम घालता येईल यावर जनजागरण अपेक्षित आहे, त्यासाठी आपण तज्ज्ञांना बोलवणार आहोत, नगरसेवकांना बोलवणार आहोत, हतबल नागरिक तर येणारच आहेत

सहभाग – वृक्ष तज्ञ डॉ नागेश टेकाळे, Tree Act १९७५च्या अभ्यासक Adv मुग्धा गोडसे, पुण्याचे चिपको कार्यकर्ते विनोद जैन, हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, बिल्डर-प्रतिनिधी समीर नातू आणि राष्ट्रीय हरित लवादात क्रांतिकारी निर्णय आणणारे प्रदीप इंदुलकर

तज्ञांच्या उपस्थितीत पुढील प्रश्नांची उत्तरे शोधूया सगळ्यांनी मिळून

  1. वृक्ष प्राधिकरण स्वतः कायदा आणि नियम पाळत नाही असे दिसते काय ? आणि हे खरे असेल तर असं का ?
  2. किशोर पवार व कांचन नाथ यांच्या मृत्यूला नैसर्गिक म्हणता येईल काय, नाही तर मग, कोण जबाबदार आहे ?
  3. ठाण्यात किशोर पवार यांच्या मृत्यूपूर्वी फांद्यांच्या छाटणीसाठी अर्ज केलेल्या नागरिकांना आधी नकार व आता खुली परवानगी देत आहे, त्यातही स्वतः जबाबदारी न घेता लोकांना खुली सूट देणे योग्य आहे का ? त्यामुळे शहरात झाडे तोडण्याची प्रमाण प्रचंड वाढले आहे, त्याचं काय ?
  4. गृह निर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष-सेक्रेटरी यांना कित्येकवेळा योग्य मार्गदर्शन होत नाही, त्यामुळे सोसायटीतील आवारातील झाडांची निगा राखणे, छाटणी करणे याबाबत काय नियम आहेत ?
  5. झाडांची योग्य निगा राखल्यास अपघात कमी होतील काय, यात सामान्य नागरिकांची भूमिका काय असायला हवी ?
  6. अनेक नगरसेवक Tree Act 1975 तील नियम आणि अटी आणि वृक्ष प्राधिकरणाची जबाबदारी आणि कर्तव्य याबाबत अनभिज्ञ आहेत, त्यांना याची माहिती मिळाली तर.. तर अधिकारी आपली कामे निट करतील काय ?
  7. बिल्डरांच्या जागेतील कमीत कमी झाडे तोडण्यासाठी काय करता येईल ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *