ठाणे मतदाता जागरण अभियान तर्फे आयोजित नागरी वृक्ष परिषदेची सुरवात वृक्ष पडून दुर्दैवी मृत्यू पावलेल्या अॅड.किशोर पवार, मुंबईतील कांचन नाथ व ठाण्यातील कॉग्रेसचे तरूण नेतृत्व बाळकृष्ण पूर्णेकर व संजय चौपाने यांना आदरांजली वाहून करण्यात आली. परिषदेचे प्रास्तावीक करतांना रोहीत जोशी यांनी अभियान करत असलेल्या कामाचा आढावा घेतला.

महानगरात वृक्ष जगविण्यासाठी विविध उपक्रम केले गेले. तोेडलेल्या जाडाला बॅंडेज केले, ग्रीन गटारी. कोपरीतील कांदळवनातील भ्रष्टाचार व वृक्ष पडून दुर्दैवी मृत्यू पावलेल्या अॅड.किशोर पवार यांची त्याच पडलेल्या झाडापाशी नागरिकांची शोक सभा या माध्यमातून हे लोकजागरण करत असतो. परिषदेचे सूत्रसंचलन पत्रकार अनूजा चवाथे यांनी केले.

सुरवातीला आपले विचार मांडताना ज्येष्ठ वृक्ष तज्ञ डॉ.नागेश टेकाळे यांनी ठाण्यात पूर्वी केतकीचे बन, वेगात धावणारी खाडी होती. प्रचंड वृक्ष राजी होती तेव्हा छत्र्या कमी व वृक्ष जास्त होते. वृक्ष हे महानगराचा श्वास आहे. वृक्षाला नागरिकत्व द्याव महापालिकेने. वृक्षाखालील जागा त्याच्या मालकीची करा. खड्डे नसलेल्या रस्त्यावरील वृक्ष सरळ वाढतात. प्रत्येक वृक्षाला स्वत:ची जैवीक व्यवस्था असते.देशी वृक्ष कमी पडतात व विदेशी वृक्षाची मूळे फार कमी खोलवर जातात. म्हणून ते पडतात.

अॅड.गौरी गोडसे या पर्यावरण कायद्यातील तज्ञ म्हणाल्या. पर्यावरण रक्षणासाठी अनेक कायदे आहेत. पण वृक्षाबाबत आपली संवेदना हळू हळू कमी झाली. वास्तवीक घरासमोर व परसात झाडे लावण्याची परंपरा आहे. पालिकेने वृक्ष प्राधीकरण तयार करावे त्यात लोकप्रतिनिधी या बरोबरच अनूभवी तज्ञ व एनजीआे तील सदस्य असावेत पण अनेक पालिकात हे पाळले जात नाही. वृक्षाबाबत तक्रार आली की पहाणी करावी किंवा माध्यम वापर करून ठरवायचे, हे काम करतांना भरपाई कशी करणार? तर ९० दिवसात तेथेच नवे झाड शक्यताे त्याच दातीचे लावावे. एक झाड तोडल्यावर अधिक वृक्ष लावावेत ते न पाळल्यास शिक्षा होऊ शकतो. हा कायदा महाराष्ट्र नागरी क्षेत्र संरक्षण व जतन अधिनीयम त्यामुळे फक्त अधिकार नाही जबाबदारी प्राधीकरणा कडे आहेत. याची अंमलबजावणी होते की नाही हे पहाणे गरजेचे आहे. याचे काटेकोर पालन केले तर मनुष्यहानी होणार नाही.कारण वृक्ष प्राणवायू देतात. झाडे सांभाळण्याची तसेच पावसाळ्यात झाडाच्या सर्व बाजूने छाटणी करून झाडाचा तोल (बॅलेन्स) राखण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र याबाबत अधिकृत धोरण ठरवले जाणे गरजेचे आहे. छ.शिवाजी महाराजांनी वृक्षाबाबत एक अाज्ञापत्र केले होते त्यात वृक्षाची काळजी आहे व व्यवहारही सांभाळला आहे.

ठाण्यातील ज्येष्ठ आर्कीटेक्ट उल्हास प्रधान म्हणाले. मी कार्यकर्ता आहे. ठाण्यातील मनपा वृक्षाबाबत हेळसांड करत आहे. ५० चौ.मी ला एक झाड व त्याकरता रू.पाच हजार भरावे लागतात. झाड न लावल्यास प्रत्येक झाडाला रू दहा हजार भरावे लागतात. असे कोट्यावधी रूपये जमा होतात. त्याचे काय होते? झाडे लावली जातात पण ती जगतात काय ? हे काेण पहाणार? तर वृक्ष प्राधीकरणाकडे ही प्रमुख जबाबदारी आहे. याकरता पालिका काही करत नाही. मग ठाण्यातील विविध संस्थांना सहभागी करून घ्यावे. या पैशाचे काय झाले? बा प्रश्न वितारला पाहिजे. यात प्रायव्हेट जीआे ट्रॅकींग करणार्या संस्था निर्माण झाल्या आहेत. वृक्ष तोडी बाबत दहा हजार रूपये भरावे लागतात.पण बागेत झाडे जगतात की मरतात याबाबत सोयर सुतक विकासकाला नाही, वृक्षप्राधिकरणाही नाही. यावर काम करण्याची गरज आहे.

पुण्यातील जागरूक पर्यावरण कार्यकर्ते विनोद जैन यांनी पर्यावरण रक्षण करतांना कोर्ट, महापालिका व शासन यांचे अत्यंत कष्टदायक अनूभव कथन केले. एकमेकाकडे बोट दाखवणे थांबवा, पुढे या स्वत:चे गिल्ट काढून टाका. वृक्ष कर प्रत्येक कुटूंब देते त्याचे काय होते? झाडांची छाटणी, व तोड करतांना पैसे देऊ नका. नागरिक पैसे देतात. ते देऊ नका. हे बदलावे लागणार स्वत: वाचा अभ्यास करा. मरणाची भाती बाळगू नका.

ठा.म.पा विरोधी पक्षनेते श्री.मिलींद पाटील म्हणाले, आम्ही थॅंकलेस जॉब करतो. टीका एेकून घेण्याकरता मी आलो आहे. वृक्ष महत्वाचे आहेतच मग कायदा का करावा लागतो? प्राधिकरणावर नेमणूका तज्ञ नेमले जात नाहीत, या मागे अर्थकारण आहे. सर्वांनी सहकार्य करावे. मी माझे काम व जबाबदारी नक्की पार पाडेन.

या परिषदेला दिवंगत अॅड.किशोर पवार यांचे कुटूंबीय परिषदेला उपस्थित होते.

प्रश्नोत्तरे – डॉ.टेकाळे – झाडांची मुळे फार खोलवर गेलेली नसतात, ट्रॅफीकमुळे धक्के लागतात, वाढीव पाण्यामुळे जमीन सैल होते व झाडे पडतात. पावसाळ्यापूर्वी कंपोस्ट मातीचा थर द्यावा. सरळ न वाढणारे झाड रोगी वा अपंग आहे हे समजाव.

अॅड. गोडसे – वृक्ष तोडण्यापूर्वी कर्मचार्यांकडे परवानगी आहे का? हे तपासावे.

उल्हास प्रधान – परवानगी देताना अटी शर्तीच्या अधिन राहून म्हणजे परवानगी नाहीच असे वाटते.

डॉ. टेकाळे – चारी बाजूनी वृक्ष छाटणी केली जात नाही त्याचा परिणाम म्हणून वृक्ष पडतो. झाडाचा बॅलेन्स ठेवणे हे गरजेचे आहे. म्हणून कर्मचार्याना प्रसिक्षण गरजेचे आहे.

मिलींद पाटील – वृक्ष प्राधिकरणाची पुनर्रचना करणे यापेक्षाही सक्षमीकरण गरजेचे आहे. या विषयातील तज्ञ व जाणकार माणसे या खात्यात असणे गरजेचे आहे. मी सभागृहात हे मुद्दे मांडीन याची खात्री बाळगा.

उल्हास प्रधान – काही झाडे तोडावी लागतात. पण आता री प्लॅनटेशन करणे शक्य आहे. पण त्याची फारशी खात्री देता येत नाही.

डॉ.टेकाळे – वृक्ष प्रत्यारोपण शक्य आहे. पण त्याची तयारी एक वर्षापूर्वी करायला हवी. त्या वृक्षाचे खालील जमिनीचे पर्यावरण व मातीचा अभ्यास करून त्याच प्रकारच्या मातीत तो वृक्ष टिकेल याची खात्री करावी लागते तरच ते यशस्वी होते श्री.जैन झाड तोडण्यापूर्वी त्याचे ड्रेस कोड करून घ्यावे. म्हणजे त्यावर नंबर घालून त्याची नोंदणी करावी. नागरिकांनी झाड कापावे म्हणून पैसे देऊ नका. वृक्ष मोजणीचे आधूनिक तंत्रज्ञान वापरून हे काम करावे.पण प्रत्यक्ष नंबर टाकावा हेच योग्य आहे त्याचा पाठपूरावा करता येणे नागरिकांना शक्य होईल.

श्री.जैन – झाडाचे दोन कायदे आहेत महाराष्ट्रात असे का? एकच कायदा का नाही? प्रत्येक राज्यातील कायदा वेगळा असे का?

मिलींद पाटील – यात जीवीत हानी झाली तर जबाबदारी पालिकेने घ्यावी व त्याबाबत मी सभागृहात प्रश्न नक्की विचारेन

ठराव:- पालिकेने वृक्ष धोरण ठरवावे, वृक्ष जतन करण्यासाठी सद्यस्थिती काय आहे त्याबाबत श्वेत पत्रीका काढावी, वृक्ष प्राधिकरणाची तातडीने पुनर्रचना करावी. वृक्ष नियोजनासाठी प्रभागवार समित्या स्थापन कराव्यात. वृक्ष अंगावर पडून होणार्या मृत्यूची जबाबदारी पालिकेने घेऊन त्याची नूकसान भरपाई द्यावी हा ठराव अनिल शाळीग्राम यांनी मांडला व परिषदेने ते मंजूर केला.

समारोप करतांना डॉ.संजय म.गो म्हणाले की चिरंतन विकासा बाबत येथील तंत्रज्ञांच्या मनात असलेला अहंगड प्रचंड वाढला आहे. निसर्गावर आक्रमण करणे, कुरघोडी करणे हेच शौर्य आहे असे मानले जाऊ लागले आहे. निसर्ग, तंत्रज्ञान व विकास याबाबत हे अधिकार नागरिकांच्या हातात असावेत या करता आमच्या शहरावर आमचा अधिकार ही चळवळ मजबूत करावी असे आवाहन त्यांनी केले.

या परिषदे करता मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच सिद्धार्थ ओवळेकर, प्रतीभा मढवी, दिपा गावंड, नरेंद्र सूरकर हे नगरसेवकही उपस्थित होते. हि परिषद यशस्वी करण्यासाठी प्रदीप इंदुलकर, रोहीत जोशी, सुनीती मोकाशी, मंगेश खातू, सुब्रतो भट्टाचार्य, अनुप प्रजापती, अविनाश मोकाशी, मुक्ता श्रीवास्तव यांनी प्रचंड मेहनत घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *