दवाखाने, रुग्णालये यांच्यासमोरून जाताना मिरवणुकीतील वाद्ये बंद करून परिसर शांत राखण्यास सहकार्य करा… आमचे कार्यकर्ते करणार प्रयत्न… आमचा कोणत्याही धर्मातील सणाला विरोध नाही, सण आणि उत्सव साजरे करण्याला विरोध नाही, सण आणि उत्सव हे आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण ते साजरे करताना त्यांचा उपद्रव होता कामा नये, कायद्याच्या व नियमांच्या मर्यादेत राहून जबाबदारीचे भान आपण सर्वांनी ठेवले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे.

ठाण्यातील एक जागरूक नागरिक डॉ महेश बेडेकर या विषयावर गेली आठ वर्षे एक न्यायालयीन लढाई करीत आहेत, त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या उत्सवात वेळोवेळी हे भान सुटून ध्वनी-प्रदूषण केले जाते, हे स्पष्ट करून प्रशासनाला ठाम भूमिका घेऊन यावर नियंत्रण करण्याचे आदेश दिले आहेत

शुक्रवार ३१ ऑगस्ट रोजी पाच दिवसाचे गणपती विसर्जित करताना मतदाता जागरण अभियानच्या कार्यकर्त्यांनी शहरभरात जवळपास पन्नास ठिकाणी आवाजाच्या पातळीचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *