*ठाण्यात प्रथमच, “पहा पालिका” नागरिकांची अभिरुप महासभा*

आयोजक- ठाणे मतदाता जागरण अभियान *

येताय ना , यायलाच पाहीजे* *कधी?* *कुठे?* *

२४ नोव्हेंबर, संध्या. ५.३० वा. हनुमान मंदिर कोलशेत गाव* *

२७ नोव्हेंबर, संध्या. ६ वा., मराठी ग्रंथ संग्रहालय जि.प. समोर, तलावपाळी* *

२८ नोव्हेंबर, संध्या ६.३० वा, शंकर मंदिर, मुंब्रा*

ठाणे महानगर हे सतत विविध प्रश्नावरून चर्चेत असते. या महानगरात ३२ गावे समाविष्ट झाल्यावर केवळ लोकसंख्या नाही तर महसूलही वाढला. आज चार हजार कोटींचे बजेट असलेली श्रीमंत महापालिका आहे. पण….. पण ही श्रीमंती कागदावर आहे. फारतर काही टक्के लोकांकडे आहे असे म्हणता येईल. पण सुमारे ८५% जनता अनेक नागरी समस्यांनी ग्रस्त आहे. अपुरे पाणी, रस्ते – त्यातील खड्डे व गायब फुटपाथ, संकटात असलेले आरोग्य, खडतर व जीवघेणा प्रवास, नको असलेले उड्डाणपूल कोणाच्या सोयीसाठी? हवेचे वाढते प्रदूषण व रोज केली जाणारी झाडांची कत्तल, कचऱ्याचे गैर व्यस्थापन व कंत्राटी कामगारांचे शोषण, सर्वत्र फक्त सिमेंट काँक्रीटचे जंगल. खाडीचे पाणी शुद्ध करण्याच्या नावाखाली जमीन बळकावली जाण्याची शक्यता अधिक तसेच जुन्या स्मृती जपण्याच्या नावाखाली करोडो रुपयांचा थीम भ्रष्टाचार, ज्याची चौकशी करायला अधिकारीच सापडत नाहीत. वॉटर फ्रंट विकास या नावाने महामुर पैसे खर्च होणार व घोडबंदर भागात महापूर येण्याची सुव्यवस्था केली जाणार.

डिजिटल ठाणे हे गोंडस नाव पण यात कोटीच्या कोटी रुपये कोणालाही न कळता गायब, असे कसे होते? महापालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा घसरलेला, आरोग्य व्यवस्था इतकी कमी की खाजगी हॉस्पिटल मध्ये कर्ज काढून जा किंवा मरा हे दोनच पर्याय. सर्व शहर कंत्राटाने चालवायचे हे धोरण मग उद्या अख्खी महापालिकाच कंत्राटाने चालवायला दिली तर? यातून नागरिकांचे अधिकार , लोकशाही यांचे काय होणार? काहींचे हित व काहींचे संबंध एकत्र आल्यावर काहीही होऊ शकते.

या व अश्याच गंभीर प्रश्नावर खुली चर्चा करण्यासाठी “ठाणे पहा पालिका नागरिकांची महासभा ” तीन ठिकाणी आयोजित केली आहे. दि. २४ नोव्हेम्बर रोजी सायंकाळी ५.३० वाजता हनुमान मंदिर परिसर, कोलशेत गाव दि.२६ नोव्हेम्बर रोजी सायंकाळी ६.३० वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे येथे. तसेच बुधवार दि.२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शंकर मंदिर मुंब्रा येथे या अभिरूप महासभेचे आयोजन करण्यात येईल

या नागरिकांच्या अभिरुप महासभेत विरोधी पक्ष नेते एक प्रस्ताव मांडतील, सभागृह नेते त्यास विरोध करतील, प्रस्तावाच्या बाजूने व विरोधात नगरसेवक व नगरसेविका बोलतील. आयुक्त प्रशासनाची बाजू मांडतील व यात काही नागरिकही आपले विचार पहिल्यांदाच व्यक्त करतील . मग महासभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महापौर आपला निर्णय देतील. राष्ट्रगीत होऊन ही जनतेची महासभा संपन्न होईल.

महासभा सभागृहात न होता जनतेत होणार आहे. कारण पालिका जनतेची, जनतेने बनविलेली व जनते करता आहे, हे लक्षात घ्या! या अभिरुप महासभेस पहाण्यासाठी व ऐकण्यासाठी जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन ठाणे मतदाता जागरण अभियानाचे अध्यक्ष अनिल शाळीग्राम, सचिव डॉ.चेतना दिक्षित, खजिनदार गिरीश साळगावकर, उन्मेष बागवे, सुनीता कुलकर्णी, अनुपकुमार प्रजापती, मुख्तार भरमार, उज्वल कर्णिक, संजीव साने, रोहित जोशी, रवींद्र पोखरकर, निशांत बंगेरा, मिलिंद गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *