दिनांक २२ मे २०१९ रोजीच्या बैठकीत वृक्ष प्राधिकरणातर्फे देण्यात आलेल्या ३५२७ वृक्षतोडीच्या मंजुर्यांना मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणीपर्यंत आता एकही वृक्ष तोडला जाऊ शकत नाही, सर्व कायदे, नियम, मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना धाब्यावर बसवत सार्वजनिक हिताच्या विरुद्ध काम करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला पुन्हा एकदा सणसणीत चपराक बसली आहे.

गेल्या काही वर्षात ठामपाची वृक्ष प्राधिकरण समिती वृक्ष कत्तलीचे आगार बनली आहे. पर्यावरणाची ऐशीतैशी करत विकासकांच्या फायद्याचे निर्णय घेऊन हजारो वृक्षांच्या कत्तलीचे तुघलकी फर्मान सोडण्याचे एकच काम ठाण्याची वृक्ष प्राधिकरण करते असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही

अयोग्य व्यक्तींची वारंवार बेकायदेशीर पणे नेमणुक केल्याने गेल्या २ वर्षात ३ वेळा वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त करावी लागण्याची नामुष्की ओढवलेली असतानासुद्धा पुन्हा नव्याने तोच अध्यय गिरविला जात आहे. वृक्ष कायद्यात अंतर्भुत रचनेप्रमाणे वृक्ष तोडीच्या प्रस्तावांवर निर्णय घ्या अगोदरची प्रक्रिया जसे की वृक्षतोडीचे प्रस्तावावर वृक्ष अधिकाऱ्यांचे टिपण, वृक्ष अधिकाऱ्याचा स्थळपाहणी अहवाल, बाधित झाडांच्या फोटो, वय, उंची, झाडांचे gps लोकेशन, इत्यादी संदर्भासकट वेबसाईटवर टाकणे, नागरिकांच्या हरकती सूचना विचारात घेऊन त्यांना सुनावणी देणे, आयुक्तांच्या अधिकारात घेण्यात आलेले निर्णय वेबसाईटवर टाकणे, त्याला आव्हान देण्यासाठी मुदत व जाहीर नोटीस देणे इत्यादींना सोयीस्करपणे बगल देत वृक्ष प्राधिकरण अपने बाप की जागिर असल्यागत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मनमानीप्रमाणे कारभार हाकणाऱयांना जरब बसावी याकरिता असे निर्णय येणे अपेक्षितच होते, अजुनही वृक्ष प्राधिकरणात किती मोठ्या प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालतो याला मुंबई उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे पुष्टीच मिळाली आहे

प्राधिकरणाच्या बेकायदेशीर कारभाराला रोहित जोशी यांनी २०१७ साली जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते, २०१७ डिसेंबर ते २०१८ नोव्हेंबर या एक वर्षाच्या काळात ठाण्यात एकही वृक्ष पाडण्यास मनाई होती. मधल्या काळात याचिककर्त्यांने माहितीच्या अधिकारात विचारलेली माहिती कायम नाकारण्यात आली, तरुणांच्या स्वयंस्फूर्त आंदोलनांना त्यांच्या मागण्यांना, ठाणेकर नागरिकांनी हजारोंच्या संख्येने घेतलेल्या हरकती सूचनांना केराची टोपली दाखवत आमचे कोण काय वाकडे करणार या अविर्भावत असलेल्या उन्मत्त वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना वापीस एक बार मुंह की खानी पडी है …

आता तरी जनाची नाही तर मनाची लाज वाटेल आणि कायद्याने ठाणेकरांच्या हिताचे निर्णय ते घेतील ही अपेक्षा, जोवर वृक्ष प्राधिकाराचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी होत नाही तोवर हा लढा चालुच ठेवणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *