ठाणे महानगरात अनधिकृत, अधिकृत, धोकादायक इमारतो तसेच चाळ व झोपडीत राहणाऱ्या नागरिकांसाठी क्लस्टर (सामूहिक विकास योजना) शासनाने मान्य केली आहे व ठाणे महापालिका त्याची अमलबजावणी बिल्डर मार्फत करणार आहे. यात किसन नगर, कोपरी, हाजुरी, लोकमान्य नगर, टेकडी बंगला व राबोडी येथे पायलट प्रोजेक्ट केले जाणार आहेत. या भागात राहणाऱ्या नागरिकांना उठवून त्याच्या इमारती पाइन त्या जागेवर नवीन इमारत बांधण्यात येईल, त्या बदल्यात आज निवास करत असलेल्या नागरिकाना कायम स्वरूपी लीज वा भाडयाच्या घरात रहावे लागणार आहे. जमीन मालकीचे हक्कही जाणार आहेत. बदल्यात आमच्याच जागेवर बिल्डरला 4 FSI देऊन प्रचंड नफा कमावण्याची संधी शासन देत आहे.

ही संधी आपणच स्वयंविकास करण्याची भूमिका घेतली तर आपणासही मिळू शकते, इतको वर्षे रहात असलेल्या जागेत आम्ही कायम भाडेकरू म्हणून का राहायचे? बिल्डरने नफा कमवायचा व नागरिकानी तोटा सहन करायचा हे कशासाठी केले जात आहे? सावध रहा…

निवडणुका येत आहेत. इमान नसलेली भरपूर आश्वासने दिली जातील, पण आपण गाफील राहू नये. म्हणूनच शासन निर्णय बदलण्यासाठी आपण संघटीत झाले पाहिजे. आज संघटीत झालो तरच आपल्याला मालकी हक्काचे घर मिळेल. हे जनजागरणाचे काम आहे. मालकी हक्काच्या घराकरता हे काम आपण वेळ काढून करणे गरजेचे आहे. तेव्हा घर हक्क परिषदेत सहभागी व्हा, इतरांना सांगा.

कधी : रविवार, ११ ऑगस्ट, सकाळी १० ते १

कुठे : श्री नगर मंगल कार्यालय, पहिला मजला, श्रीनगर पोलीस स्टेशन समोर, वागळे इस्टेट, ठाणे.

वक्ते : ज्येष्ठ नगररचनाकार श्री. चंद्रशेखर प्रभू आणि विस्थापित होणारे नागरिक

परिषदेच्या अध्यक्षस्थानी : उन्मेष बागवे, ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते 

परिषदेच्या मागण्या :- 

→ मालकी हक्काचे घर मिळालेच पाहिजे.

→ विस्थापित होणाऱ्या सर्वाना आधी हमी पत्र द्या.

→ लोकांना बेदखल करण्याआधी क्लस्टरचा पूर्ण आराखडा द्या,

→ क्लस्टर बांधकामाच्या सर्व परवानग्या आणि पर्यायी निवारा मिळाल्याशिवाय इमारत तोडू नका.

→ हक्काच्या घराचा करार स्थानिक निवासी. बिल्डर व ठाणे महापालिका असा त्रिपक्षीय करार केल्याशिवाय घर रिकामे करू नका, इमारत पाडू नका.

→ क्लस्टर मधील सर्व प्रकल्प रेरा कायद्यात नोंदवणे सक्तीचे करा.

→ बाधित व्यापाऱ्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ट्रान्झिट बाजार द्या.

→ स्वयंविकास करू असे एकत्रीत म्हणणाऱ्या नागरिकांना अर्थसहाय्य व अन्य कायदेशीर मदत उपलब्ध करा

→ क्लस्टरविषयी प्रशासकीय कागदपत्रे मराठीत उपलब्ध करा, क्लस्टर प्रकल्पाचे वेगळे संकेतस्थळ काढून त्यात संपुर्ण माहिती उपलब्ध करा.

घर व जमीन आमच्या हक्काची ! नाही कुणाच्या बापाची !!

संपर्क – डॉ चेतना दीक्षित, सचिव, 9867100199

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *