स्वयं-पुनर्विकासातून क्लस्टर योजना यशस्वी होऊ शकते, भाडेकरूंना मोठी घरे आणि ती ही मालकीची :- नगर रचनाकार चंद्रशेखर प्रभू यांचे प्रतिपादन, घर हक्क परिषद यशस्वी


ठाणे महानगर पालिकेच्या वतिने राबविण्यात येणारी क्लस्टर योजना नागरिकांनी स्वयंविकासातून अमंलात आणल्यास यशस्वी ठरुन नागरिकाना हक्काचे घर मिळू शकेल. क्लस्टरमध्ये स्वयंविकासाच्या मार्गाने नागरिकांनी घरे बांधल्यास मालकीचे घर मिळेलच पण ३२३ काय ६०० ते ८०० स्क्वे.फुटाचे घर प्रत्येकाला मिळेल, राजकारणी नेते आणि बिल्डर यांना दूर सारा, जनतेने स्वयंविकास करण्यास तयार रहा – असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यानी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने आयोजित घर हक्क परिषदेत केले .

क्लस्टर योजने अंर्तगत विकसित होणारी घरे नागरिक स्वत: बांधू शकतात. त्यासाठी बिल्डर आणि राजकिय नेत्यांची गरज नाही. नागरिकांच्या स्वयं विकासानेच हि योजना यशस्वी होउ शकेल. क्लस्टर योजनेचे मुळ तत्व असे आहे की हि योजना संबधित नागरिकांच्या संमतीने बाधण्यात यावी, तेव्हा पुर्वविकासाचे प्लान तयार करणे, आवश्यक परवानग्या मिळविणे, बांधकामासाठी अर्थसहाय्य मिळविणे व दर्जेदार बांधकाम करणे. इत्यादी गोष्टी सहकाराच्या माध्यमातून करणे नागरिकांना शक्य असून त्यामुळे नागरिकाना अधिक क्षेत्रफळाची (Carpet Area) घरे मिळणे शक्य होइल व त्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन व सहाय्य करण्याची तयारी नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यानी दर्शविली आहे.

ठाणे महानगर पालिकेच्या वतीने ठाण्यातील अनधिकृत झोपडपट्टि, मोडकळीस आलेल्या इमारंतिंच्या पुर्नविकासाकरीता, अधिकृत, धोकादायक इमारती तसेच चाळ व झोपडीत राहणाऱ्या नागरिकांसाठी क्लस्टर (सामूहिक विकास योजना/ अर्बन रिन्युअल प्लान) योजना, हि महाराष्ट्र शासनाने तयार केलेली योजना राबविण्यात येत आहे . व ठाणे महापालिका त्याची अमलबजावणी बिल्डरमार्फत करणार आहे. यात किसन नगर, कोपरी, हाजुरी, लोकमान्य नगर, टेकडी बंगला व राबोडी येथे पायलट प्रोजेक्ट केले जाणार आहेत. यात जनतेला आपल्याच जागेवर विकसित इमारतीमध्ये भाड्याचे (लीजचे) घर मिळणार आहे, या त्रूटिमुळे हि योजना उपयुक्त असूनही गैरलागू व अन्याय कारक असल्याची भावना ठाणेकर नागरिकांमध्ये आहे. ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतिने या विरोधात सातत्याने आवाज उठवित पालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. या क्लस्टर योजनेतील त्रूटि दुर करुन हि योजना नागरि हिताची बनून नागरिकाना हक्काचे घर मिळावे या करिता घर हक्क परिषदेचे आयोजन अभियानाच्या वतीने श्रिनगर वागळे इस्टेट ठाणे येथे श्री मंगल कार्यालयात करण्यात आले होते.

परिषदेचे अध्यक्ष श्री.उन्मेष बागवे यांनी नागरिकांच्या नव्या संघर्षाची ही सुरवात आहे, या क्लस्टर मधील योजना जनतेच्या हिताच्या नसतील तर त्यास आमचा विरोध आहे, ठाण्यातील सर्व लोकप्रतिनिधिनां शिष्टमंडळासह भेटून निवेदने देण्यात येणार असून क्लस्टर योजना स्वयंविकासाच्या माध्यमातून राबविण्यात येण्याकरिता ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या माध्यमातून पुढिल मोहिम हाती घेण्यार असल्याची घोषणा घर हक्क परिषदेचे अध्यक्ष उन्मेश बागवे यानी केली आहे.

मालकीचे घर मिळण्यासाठी आणि आमच्या घरासाठी आम्ही बिल्डर, राजकारणी नेते आणि त्यांचे चमचे यांना दूर सारून या क्लस्टर योजनेत स्वयंविकास मार्गानेच आमची घरे बांधू, त्यासाठी प्रत्येक विभागात प्रामाणिक स्थानिक नागरिकांच्या समित्या बनविल्या जातील व चंद्रशेखर प्रभू आणि न्यायालयात जाण्याची वेळ आल्यास Adv सुनील दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली व मतदाता जागरण अभियानाच्या पुढाकाराने नागरिक शक्ती आता क्लस्टर राबविणार, असा निर्धार या परिषदेस हजर असणारे नागरिक करीत आहेत असा मुख्य ठराव संमत करण्यात आला

जेष्ठ विधिज्ञ सुनील दिघे यानी क्लस्टर योजनेतील कायदेशीर बाबींचा उलगडा यावेळी केला. एड. सुनील दिघे यांनी विविध कायदेविषयक अनेक तरतुदी व धोक्याचे इशारे काय आहेत हे समजावून सांगीतले. बदलत्या काळात आपण जागरूक राहावे संघटित असे आवाहन आहे.

क्लस्टर योजना नागरिकांच्या सहभागातून निर्माण होण्या करिता विभागवार समित्यांची निर्मिती करण्यात आली असून या समितीत सहभागी होण्याकरीता नागरिकानी पुढे यावे असे आवाहन अभियानाचे अध्यक्ष संजिव साने यानी केले आहे.

नागरिकांनी मांडलेले ठराव कि क्लस्टर योजने अंर्तगत विकसीत होणारी घरे मालकी हक्काने मिळावीत, बाधित होणारया नागरिकाना घर मिळण्याचे हमीपत्र मिळावे, क्लस्टर योजनेचा आराखडा व सर्व माहिती मराठीत नागरिकांना मिळावी, विकास कालात पर्यायी निवारा व्यवस्था व्हावी, क्लस्टर योजने अंर्तगत मिळणारया घरांचा त्रिपक्षिय करार( बिल्डर ठाणे महानगर पालिका आणि स्थानिक निवासी ) करावा, बाधित व्यापारयानां ट्रांझीट बाजार द्यावा, स्वयंविकास करु इच्छिणारया नागरिकाना अर्थ सहाय्य व कायदेशीर मदत उपलब्ध करुन द्यावी, क्लस्टर विषयीचे नियम मराठीत उपलब्द व्हावेत व या विषयीची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध व्हावी असे ठराव घर हक्क परिषदेत करण्यात आले आहेत. सुभाष देसाई, रमेश वर्मा, रवींद्र करंगुटकर, सुनीता कुलकर्णी, डॉ.चेतना दिक्षीत, श्याम सोनार, राजाभाऊ चव्हाण, प्रकाश पाटील यांनी ठराव मांडले त्यास सर्वश्री नागपुरे, जैन, मधुकर होडावडेकर, सिद्धेश देसाई, सुजाता घाग, दीपेश पांचाळ, विश्वनाथ थोरात, बाळा मांडकूलकर, मोहिते, संजय घाडीगावकर, डॉ.अभिजित पांचाळ, अनुपकुमार प्रजापती यांनी अनुमोदन दिले. प्रास्ताविक व संचलन संजीव साने यांनी केले, आभार अनिल शाळीग्राम यांनी मानले राष्ट्रगीत होऊन परिषदेची सांगता झाली. मोठ्या संख्येने सुमारे ६०० नागरिक परिषदेस उपस्थित होते

ठाणेकर जनता क्लस्टर योजनेला पूर्ण पणे विरोध करून स्वयं विकासाचा मार्ग अवलंबणार असेल तर सर्व सागरी जिल्ह्यातील गावठाण, कोळीवाडे व पाड्यातील भूमिपुत्र ठाणेकरांना स्वयं विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य मदत करण्यास तयार आहे व त्याच्या पाठीमागे ठाम व खंबीरपणे उभे राहणार आहे, असे चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समिती व ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीच्या वतीने जाहीर केेले


प्रमुख वक्ते ज्येष्ठ नगर रचनाकार श्री. चंद्रशेखर प्रभू यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले निवडून आलेले प्रतिनिधी जनतेला खरी माहिती देत नाहीत. कारण ती त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात असते. एफ.एस. आय व टी डी आर याची माहिती दिली पाहिजे. सरकारी जमीन फ्री होल्ड देता येत नाही. क्लस्टर मध्ये जमिनीच्या मालकी बाबत सगळ्यांच्या नावावर नाहींत. क्लस्टर मध्ये मालकी हक्काचे घर मिळालेच पाहिजे. क्लस्टर योजने अंर्तगत विकसित होणारी घरे नागरिक स्वत: बांधू शकतात. त्यासाठी बिल्डर आणि राजकिय नेत्यांची गरज नाही. नागरिकांच्या स्वयं विकासानेच हि योजना यशस्वी होउ शकेल. क्लस्टर योजनेचे मुळ तत्व असे आहे की हि योजना संबधित नागरिकांच्या संमतीने बाधण्यात यावी. तेव्हा पुनर्विकासाचे प्लान तयार करणे, आवश्यक परवानग्या मिळविणे, बांधकामासाठी अर्थसहाय्य मिळविणे व दर्जेदार बांधकाम करणे इ गोष्टी सहकाराच्या माध्यमातून करणे नागरिकांना शक्य असून त्यामुळे नागरिकाना अधिक क्षेत्रफळाची ( Carpet Area) घरे मिळणे शक्य होइल व त्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन व सहाय्य ठाणेकरांना करण्याची तयारी नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यानी दर्शविली आहे.

 

ही अट पूर्ण केल्याशिवाय परवानगी देता येणार नाही. जे रहिवासी आहेत त्यांचे हितसंबंध जपण्यासाठीच काम करत आलो आहे. तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊनच ही चळवळ आपण चालविली पाहिजे. जे दहा ठराव केलेत ते योग्यच आहेत. त्याचा नेटाने पाठपुरावा करावा. बिल्डरच्या मागे नेताच असतो. दोघे मिळून आपल्या घामाच्या पैशाने प्रचंड पैसा कमवितात, स्वयंविकास केल्यास त्यांचा हा प्रचंड नफा आपल्या हाती राहतो आणि आपल्याला चांगल्या दर्जाचे मोठे घर मिळते.

१) बिल्डर इमारत बांधत नाही तर विविध कंत्राटदार इमारत बांधतात. जो कंत्राटदार बिल्डरची इमारत बांधतो तो कंत्राटदार आपल्यासाठीही इमारत बांधेल. याची तयारी जनतेने करावी.

२) बिल्डरकडे पैसा असतो म्हणून तो बिल्डींग बांधतो असे नाही, बिल्डर आपल्याच पैशाने किंवा कर्ज घेऊन बिल्डींग बांधतो, स्वयंविकास करण्यासाठी आपल्याला केवळ २.५ टक्के व्याजाने पैसे द्यायला बँका तयार आहेत.

३) सर्व परवानग्या त्याला आपोआपच मिळतात, हे खरे नाही. त्या करता एक एजन्सी असते ते ती काम करते.आपण त्या लवकर आणू शकतो.

४) प्लॅन कसा करू नये याचे उत्तम ठाण्यात दिसते. त्यात सेलेबल इमारत चकाचक मागे स्थानिक रहिवाश्यांचे हे अत्यंत गलिच्छ धोरण आहे. तर सेलेबल इमारतीतच स्थानिक नागरिकांना घरे द्यावीत. प्रचंड मोठे फ्लॅट तयार करायचे ज्यात सामान्य नागरिकांना घर घेणे परवडणारच नाही. अशी व्यवस्था केली जाते. असे मुलुंड मधील मोठी सोसायटी आज धोकादायक झाली आहे. तीचा स्वयंविकास आम्ही करत आहोत.

५) जे बिल्डर देतो ते आपणही करू शकतो, हे लक्ष्यात घ्या म्हणून स्वयंविकास हेच धोरण योग्य आहे. ते आपण करा. म्हणजे आपणास ३२३ काय ६०० ते ८०० फुटाचे घर मिळू शकते. पूर्वरंग (मुलुंड), चित्रा सोसायटी (शेल कॉलनी) पंत नगर (घाटकोपर) या प्रकल्पांना भेट द्या व निर्णय करा. जो नागरिकांच्या हिताचा असेल. तेव्हा नागरिकांची एकजूट हाच उपाय आहे, कुठेही सह्या करू नका, दिल्या असतील तर त्या प्रतिज्ञापत्रक भरून परत घ्या, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *