वेदांत हॉस्पिटल समोर वेदांत दासचा मृत्यू, कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करा – ठाणे मतदाता जागरण अभियानची मागणी

दि.१५ ऑगस्ट रोजी वेदांत विक्रम दास याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कंत्राटदाराने अर्धवट केलेल्या कामाचा व राज्य रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याच कामाचे न तपासता पैसे दिले म्हणून कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, व कायदेशीर कारवाई करा अशी मागणी करण्याकरता व वेदांत ला श्रद्धांजली देण्या करता ठाणे मतदाता जागरण अभियानने आज 18 ऑगस्ट रोजी दुपारी 4 ते 5 शांततामय मार्गाने निदर्शने आयोजित केली होती.

त्यात चेतना दीक्षित, अनिल शाळीग्राम, उन्मेष बागवे, विरेंद्र सावंत, मंगेश खातू, रमेश वर्मा, सुभाष ठाकरे, हेमंत शर्मा, अफजल, शिवाकांत मिश्रा, उमेश मिश्रा, संजीव साने, राजेंद्र यादव, दुर्गेश चौरसिया, शिवकांत यादव, संतोष भोईर, अनंता शिंगे, सुब्रतो भट्टाचार्य सहभागी झाले होते.

ठाण्याचे पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. रस्ते विकास महामंडळ त्यांच्या अखत्यारीत काम करते, त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांचे विरुद्ध स्वात: गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पण जर त्यांनी अशी भूमिका घेतली नाही तर ते कंत्राटदार व अधिकारी यांना वाचविण्याचे काम करत आहेत असेच मानले जाईल. असे ठाणे मतदाता जागरण अभियानाचे मत आहे.

यावेळी बालकुमार वेदांत दास यास दोन मिनिटे शांत उभे राहून श्रद्धांजली वहाण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *