Metro 4
मेट्रो 4 अंडरग्राऊंड करावी या याचिकेच्या सुनावणी दरम्यान MMRDA ला वृक्ष-तोडीसाठी 20 सप्टेंला मिळालेली स्थगिती सोमवारी उठविल्याबरोबर परवा मध्यरात्री ठाण्यातील लुईसवाडी हायवे येथील झाडांची कत्तल MMRDA ने सुरू केली, रात्री 2 वा. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ती थांबविली मात्र…

रोहित जोशी यांच्या वृक्ष प्राधिकरण – पहिल्याच बैठकीत 3000+ झाडे तोडायला परवानगी देण्याच्या निर्णयाच्या विरोधात निर्णय घयायलाच न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही MMRDA ने झाडे तोडणे हे बेकायदेशीर व न्यायालयाचा अवमान करणारे आहे, या संदर्भात ही वृक्ष तोड पूर्ण थांबवावी व ठाण्यातील झाडे व पर्यावरण वाचवावे, म्हणून महापौर श्री नरेश म्हस्के यांची ठाण्यातील पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांनी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या पुढाकाराने भेट घेतली, तेंव्हा ठाणे पालिकेचे वृक्ष अधिकारी केदार पाटील यांना महापौरांनी आपल्या दालनात बोलावून चौकशी केली.

वृक्ष अधिकारी यांनी ठाण्यातील वृक्ष तोडण्यावर स्थगिती आहे, हे कबूल केले व न्यायालयाचा अवमान झाला अशी नोटीस आल्याचे सांगीतल्यावर आपण काय कारवाई केली अशी विचारणा महापौरांनी केली, त्याला आपण MMRDA ला पत्र लिहून कळविले आहे असे गुळमुळीत उत्तर दिले.

महापौरांनी ताबडतोब MMRDA अधिकारी व ठेकेदारांवर पालिकेच्या वतीने गुन्हा दाखल करा, असे लेखी आदेश पालिकेच्या वृक्ष अधिकारी केदार पाटील यांना शिष्टमंडळाच्या समक्ष दिले.

ठाण्यातील प्रत्येक झाड वाचविणे हे आपले कर्तव्य असून आरेप्रमाणे इथे लवकरच आंदोलन उभे केले जाईल, पालिकेने गुन्हा दाखल न केल्यास उद्या नागरिकांच्य वतीने गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती शिष्टमंडळाच्या वतीने ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या सचिव डॉ चेतना दीक्षित यांनी दिली आहे. शिष्टमंडळात डॉ चेतना दीक्षित, रोहित जोशी, उन्मेष बागवे, श्याम सोनार, राकेश घोलप होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *