ठाणे महापालिकेत चालणाऱ्या गंभीर बाबींकडे आपले, जागरूक नागरिकांचे, लक्ष वेधू इच्छितो …

हजुरीच्या उर्दू शाळेतील मैदानात डेटा सेंटरसाठी इमारत प्रस्तावित असल्याने विद्यार्थी मैदानाला मुकण्याची शक्यता आहे, म्हणून राष्ट्रवादीच्या पुढाकाराने शाळकरी विद्यार्थ्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला होता, लगेच तो प्रश्न महासभेत चर्चेला आला असता, शिक्षण समिती आणि प्रशासन यांनी एक अफलातून तोडगा काढला आहे कि या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तशा स्वरूपाचे मैदान उपलब्ध करून दिले जाऊ शकते… म्हणजे काय ?

मला काय त्याचं ?
मुळात महापालिका शाळा आणि त्यांची मैदाने हे आता राजकारण्यांच्या डोळ्यात खुपू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी सावरकर नगर येथील शाळेत तळमजल्यावरील दोन मोठे वर्ग CSR च्या नावाखाली डी-मार्ट ने हडप केले, त्याला आम्ही विरोध केला, तरीही पालिकेने तो प्रकल्प रेटलाच आणि आता हे… पण मला काय त्याचं, असं म्हणत ठाण्यातील शिक्षण-व्रती, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणाच्या प्रश्नावर काम करणारे कार्यकर्ते विरोध करीत नाहीत, तिथे महापालिकेतील अर्धवट अधिकारी व शिक्षण समितीचे पदाधिकारी यांचे फावते. शिक्षण-क्षेत्रात काहीतरी चुकीचं होतंय तरी आम्ही गप्प बसणार.. ठाण्यात झाडांची कत्तल होत असली तरी शहरातील पर्यावरणवादी गप्प बसणार… मग हे असंच होत राहणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *