आरे जंगल – भयाण विकासासाठी एक एक झाड तोडत, समुद्राच्या पाण्यात भर टाकत हि मुंबई वाढत गेली, कॉंक्रीटचे जंगल वाढत जात असतानाच मुंबईतील शेवटचे जंगल व शेवटची हिरवळ – म्हणजे आरे जंगल… ते देखील आता मेट्रोच्या नावाने अविचारी राजकारण्यांनी तोडायला घेतले, न्यायालयाने देखील पर्यावरण-रक्षकांची बाजू पुरेशी लक्षात न घेतल्याने त्यांना परवानगी दिली आणि त्या रात्री MMRDA चा राक्षसी नंगानाच सुरु झाला, कोर्टाचा निकाल आल्या आल्या, निकालाची प्रत तयार झाली नाही, न्यायाधीशांची त्यावर स्वाक्षरी झाली नाही, कायद्याप्रमाणे त्यावर सर्वोच्च नायालयात त्याला आव्हान दिले जाऊ शकते, त्यामुळे थोडी उसंत घेणे गरजेचे असताना सुद्धा हे राक्षस थांबले नाहीत, भयाण काळ-रात्री यांनी या जंगलातील वृक्षांवर यांत्रिक कुऱ्हाड चालवायला सुरुवात केली. अशावेळी

हे वीर धावले, तरुण तरुणींनी प्रत्येक झाड वाचवायचा निर्धार करत आरे जंगलात मध्यरात्री धाव घेतली. पोलिसांनी त्यांना बोलण्याची संधी दिली नाही, झाडे तोडणाऱ्या राक्षसांना साथ देत २९ निर्भय तरुण-तरुणींना ताब्यात घेतले… कोर्टात उभे केले. खटले भरले, तुरुंगात डांबले… पण त्यांच्या या संघर्षामुळे काही राजकीय पक्षांना त्याची दखल घ्यावी लागली, शिवसेनेने दिलेला शब्द पाळला आणि आरेमध्ये मेट्रो कारशेड करण्याचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला. काल सुप्रीम कोर्टाने देखील या वृक्ष-तोडीवरील स्थगिती कायम ठेवली.

हे सगळे करण्यात, घडवून आणण्यात, आरे जंगल वाचविण्यात यांचा सिंहाचा वाटा म्हणून त्यांचा सत्कार, ठाणेकर नागरिकांच्या वतीने…

या २९ धाडसी युवक-युवतींचा सत्कार …
Sandeep parab, Sonali Nimle, Pramila Bhoir, Shruti Nair, Swapna Swar, Meemansa Singh, Mayur Agare, Sagar Gawde, Sandesh Ghosalkar, Vinit Vichare, Manojkumar Reddy, Manan Desai, Siddharth Anbhavane, Akash Patankar, Shridhar A, Kamlesh Shamanthula, Divyang Potdar, Nelson Lopes, Ruhhan Alexander, Prashant Kamble, Siddharth Sakpale, Shashi Sonawane, Vijaykumar Kamble, Stiphan Misal, Kapildeep Agarwal, Aditya Pawar, Swapnil Pawar, Vignesh Ghosalkar, Dwayne Lasrado

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *