देशात झुंडशाहीचे अनेक बळी घेतले गेले. वस्तुस्थिती जाणून न घेता किंवा केवळ संशयामुळे या समूह हत्या करण्यात आल्या. समाजात हिंसक झुंडीचा न्याय प्रस्थापित केला जात आहे. अशा घटना ज्या ठिकाणी घडल्या तेथे जाऊन याची प्रत्यक्ष माहिती घेऊन हे पुस्तक लिहिले गेले आहे. त्याचे नाव “कारवा ए मुहब्बत” असे आहे. ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी हर्ष मंदर यांच्या पुस्तकाचे मराठी रूपांतर स्वातीजा मनोरमा व प्रमोद मुजुमदार यांनी “प्रेमाची वारी” या नावाने प्रकाशित केले आहे.

देशभर विविध कारणाने अविश्वासाचे वातावरण आहे. सतत एक तणाव समाजात असल्याचे जाणवते आहे. हे समाजाच्या विकासासाठी अयोग्य आहे. त्यामुळे समाजात प्रेम, भाईचारा वाढवा व टिकावा या हेतूने “प्रेमाची वारी” या महत्वपूर्ण पुस्तकाचे अभिवाचन, सलोखा गट, पुणे यांचे श्री.प्रमोद मुजुमदार व त्यांचे सहकारी करणार आहेत, नंतर त्यावर चर्चा होईल. महाराष्ट्रातील अनेक गावांत, महाविद्यालयात या अभिवाचनाचे कार्यक्रम ‘सलोखा गटाने’ केले आहेत. या अभिवाचनानंतर होणारी चर्चा जनतेच्या केवळ माहितीत भर घालत नाही तर सहभागी होणाऱ्या व विचार करणाऱ्या व्यक्तीची दृष्टी अधिक विशाल व व्यापक होते.

हे केवळ एक पुस्तक नाही तर कृतीशील होण्याचा, सुचविण्याचा हा मार्ग आहे. प्रेम, परस्पर सहाय्य, स्नेह, बंधुभाव व विश्वास याची गरज समाजाला आहे हा संदेश या जाहिर अभिवाचनातून दिला जातो. ज्याची आज सर्वात जास्त गरज आहे.

हा कार्यक्रम सोमवार दि. २० जाने २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय, जिल्हा परिषदे समोर, प्रभात सिनेमा जवळ, ठाणे (प) येथे होईल. मोठ्या संख्येने जनतेने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन लोकजागर व ठाणे मतदाता जागरण अभियानाचे संजीव साने, डॉ.चेतना दिक्षित, अनिल शाळीग्राम, सुनीता कुलकर्णी, उन्मेष बागवे, एड.जयेश श्रॉफ, सुनीती मोकाशी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *