आज क्लस्टर योजनेचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे, एकूणच चांगल्या योजनेची अंमलबजावणी चुकीच्या मार्गाने होत आहे… योजनेच्या आराखड्यात अनेक त्रुटी आहेत पण सरकार दरबारी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे भविष्यात जनतेचे हाल होणार आहेत, बिल्डर राजकारणी यांच्या फायद्यापेक्षा व्यापक जनसहभाग, तज्ज्ञांचा सहभाग व स्वयं-पुनर्विकास हाच योग्य मार्ग आहे

क्लस्टर योजना चांगली आहे, आवश्यक आहे पण खूप अर्धवट आहे, नियोजन शून्य आहे आणि चूकीच्या पद्धतीने राबविली जात आहे. आताची योजना, मिळालेल्या माहितीनुसार पूर्णपणे बिल्डरांच्या फायद्याची नाही… म्हणजेच अधिकारी व राजकारणी यांच्या फायद्याची आहे.

म्हणून, पूर्ण योजना व नकाशे बनविल्याशिवाय, मतदाता जागरण करीत असलेल्या नऊ मागण्या, कोळीवाडा गावठाण संघर्ष समितीची महत्वाची मागणी की गावठाणे क्लस्टर योजनेत वगळण्याबाबतच GR हे व्हायलाच हवे, त्या शिवाय ही योजना यशस्वी होणार नाही, हेच आमचे दु:ख आहे

म्हणून मतदाता जागरण अभियान व क्लस्टर बाधित रहिवाशी यांची भेट मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर आपल्या मागण्या टाकायच्या आहेत, त्यासाठी सर्व नागरिकांनी उद्या 12 वा. किसननगर येथे यावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *